डॉ नरसिंह भिकाणे यांना ‘ग्लोबल लिडरशीप राष्ट्रीय अवार्ड’ प्रदान

निलंगा : पाेलीसनामा ऑनलाईन

प्राईम टाइम रिसर्च मिडिया आणि आज तक यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल लिडरशीप अवार्ड  २०१८’ हा राष्ट्रीय पुरस्कार मनसेचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांना देण्यात आला.  ‘सोशल हेल्थ अवेरनेस प्रोग्राम आॅर्गनाईज इन लातूर महाराष्ट्र’ या श्रेणीत नुकताच दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ योगानंद शास्त्री व समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस अमरसिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab2c76aa-a612-11e8-a89a-314aeede94c3′]

गेल्या २५ वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागात शेतकरी शेतमजूर वाडी वस्ती आश्रमशाळा आशा विविध ठिकाणी डॉ नरसिंह भिकाणे यांनी मोफत आरोग्य शिबीरे घेण्याचा यज्ञ चालविला सन २०१५ या दुष्काळी वर्षात तर शेतकऱ्यांसाठी सतत चार महिने जिल्हाभर मोफत आरोग्य शिबीरे राबवुन डॉ भिकाणे यांनी दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा दिला त्यांच्या याच कार्याची दखल दिल्ली येथील प्राईम टाईम रिसर्च मेडीया आणि आज तक ने घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवर ‘ग्लोबल लिडरशीप अवार्ड’ देऊन सन्मानित केले.

यावेळी अमरसिंह यांनी डॉ भिकाणे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत लातूर जिल्हा सेवाभावी वृत्ताचा वसा घेतलेला जिल्हा आहे असे गौरवोद्गार काढल्याचे डॉ भिकाणे यांनी सांगितले. पुरस्काराबद्दल त्यांचे महाराष्ट्र भरातुन कौतुक होत आहे.