Dr Neelam Gorhe | पुणे शहरात भाजपचे अनेक प्राणी, त्यातीलच आमदार सुनील कांबळे एक – डॉ. नीलम गोर्‍हे (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr Neelam Gorhe | शहरात भाजपचे अनेक प्राणी आहेत, त्यातीलच एक प्राणी आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) असून त्यांनी महिलेशी बोलताना अपशब्द वापरले आहेत. प्राण्यांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा काय करायची. यापूर्वी हाच प्रकार त्यांनी महिला डॉक्टरबद्दल केला होता. त्या बिचाऱ्या महिलेने मला रडत फोन केला होता. आता पुन्हा या व्यक्तीने अपशब्द वापरले आहेत, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी केली आहे.

सुनील कांबळे यांच्यावर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा. नाहीतर शिवसेना (Shivsena) महिला आघाडीने जाऊन तक्रार दाखल करावी. त्याचा पाठपुरावा मी करते, असं देखील यावेळी गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) म्हणाल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

 

 

पुणे कॅटोमेंट मतदारसंघाचे (pune cantonment assembly constituency) भाजप आमदार सुनील कांबळे यांनी मर्यादा ओलांडत महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा ऑडीओ सध्या चांगलाच गाजत आहे. संबंधित महिला या महापालिकेत कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी कांबळे यांनी त्यांना फोन केला होता, यावेळी महिला अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांशी बोलण्यास सांगितल्याने कांबळेंनी शिवीगाळ केली.

ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्यास कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन लावला. त्यावेळी संबधीत महिला अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या कांबळे यांनी संबधित महिलेस घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. महिला अधिकारी आणि आमदार सुनील कांबळे यांच्यात जवळपास 2 मिनिटाचे संभाषण झाले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (NCP Rupali Chakankar) यांनी सडकून टीका केली आहे.
भाजप आमदार कांबळेंनी नालायकपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, हे तर आरएसएसचे संस्कार आहेत.
भाजपच्या चिखलात अशीच कमळे उगवणार, असं त्यांनी म्हंटले आहे.

मनसे नेत्या रुपाली पाटील (MNS Rupali Patil) यांनी देखील कांबळेंच्या कथित ऑडीओ क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे.
संबंधित महिला अधिकारी यांच्या पाठीशी मनसे उभी आहे. त्यांनी कांबळेंवर गुन्हा दाखल करावा.
भाजपने देखील कारवाई करणे गरजेचं आहे.
तसेच कायम महिला सबलीकरणाचा नारा देणाऱ्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) आता काय करणार,
असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Web Titel :- Dr Neelam Gorhe | Many animals of BJP in Pune city, MLA Sunil Kamble is one of them – Dr. Neelam Gotrahe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | अजितदादा आमच्या माणसाचं थोडं ऐकत जा ! नाहीतर गडबड होईल, संजय राऊतांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Sanjay Raut |’अजित दादांनी ऐकलं नाही तर त्यांना सांगावं लागेल की, मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेत’, संजय राऊतांचा सूचक इशारा (व्हिडीओ)

Pune Cyber Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 16 लाखांना घातला गंडा; डेबीड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून केला गैरव्यवहार