Dr. Neelam Gorhe on Raj Thackeray | ‘राज ठाकरे यांचा राजकीय गेम होईल’ – डॉ. नीलम गोऱ्हे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Dr. Neelam Gorhe on Raj Thackeray | गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या भोंग्याच्या भूमिकेवरुन राज्यात चर्चा रंगल्या आहेत. त्यातच त्यांनी शिवसेनेला टार्गेट केलं आहे. शिवसेना (Shivsena) आणि मनसे (MNS) वाद वाढला असल्याचं दिसत असतानाच आता शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरात (Kolhapur News) माध्यमांशी संवाद साधला. (Dr. Neelam Gorhe on Raj Thackeray)

 

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ”राज ठाकरे पक्ष वाचविण्यासाठी धडपडत आहेत. ध्वज बदलून पाहिला. भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. सीमाप्रश्नी वेगळी भूमिका मांडली. आता पुन्हा हिंदुत्वाकडे वळले आहेत. फायदा घेऊन त्यांचा राजकीय गेम होईल, त्यावेळी त्यांना शिवसेनेशिवाय कोणीही दिसणार नाही,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, पुढे नीलम गोऱ्हे यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. ”राज्यात भाजपकडून केवळ विरोधाला विरोध असे राजकारण केले जातेय. केवळ उपद्रव द्यायचा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली जात आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजपमधीलच विनोद तावडे (Vinod Tawde), पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा विश्वास संपादन करू शकलेले नाहीत. त्यांना राज्याबाहेर जाण्याची वेळ आणली आहे. ते इतरांचा काय विश्वास संपादन करणार ? मुख्यमंत्री चांगले काम करत असतानाही नाहक आरोप केले जात आहेत. यामुळेच 14 मे रोजी मुंबईत होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात उपद्रवी वृत्तीला चोख उत्तर मिळेल.” असं त्यांनी म्हटलंय.

 

Web Title :- Dr. Neelam Gorhe on Raj Thackeray | MNS chief raj thackeray political game will be says dr neelam gorhe

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा