पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dr Neelam Gorhe | राजकारण व महिलांचे प्रश्न या क्षेत्रांबरोबर एक सिद्धहस्त लेखिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या राजहंस प्रकाशनच्या ‘ऐसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता राज्यपाल रमेश बैस यांचे शुभहस्ते राजभवन येथील दरबार हॉल येथे आयोजित केला आहे. (Dr Neelam Gorhe)
या प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रख्यात साहित्यिक व माजी साहित्य संमेलन अध्यक्ष सदानंद मोरे, तसेच स्वत: डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह या पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या करुणा गोखले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना महिला आघाडीच्या शीतल म्हात्रे, तसेच साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणेच्या अंजली कुलकर्णी, स्त्री आधार केंद्र, पुणेतर्फे जेहलम जोशी, गीतांजली सेवाभावी संस्था, सांगली यांच्या सुनीता मोरे यांनी केले आहे. (Dr Neelam Gorhe)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update