Dr Neelam Gorhe | टायर कंपन्यांकडून राज्यातील ग्राहकांची फसवणूक होत असल्याने राज्य ग्राहक मंच यांनी ‘स्वाधीकारे’ चौकशी करण्याची उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना

मुंबई/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr Neelam Gorhe | टायर कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याबाबत प्रतियोगिता आयोगाने टायर उत्पादकांनी कमी झालेल्या कच्च्या मालाच्या किंमतीचा लाभ ग्राहकाना न देता, ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी टायर उत्पादकांच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही केली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रतियोगिता आयोगाने केलेली कारवाई योग्य ठरविली आहे. (Dr Neelam Gorhe)

महाराष्ट्र राज्यातील अनेक ग्राहकांनी या कंपन्यांकडून टायर्स खरेदी केले असून त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. सदर प्रकरणी राज्यस्तरीय ग्राहक मंच द्वारे स्वाधीकारे चौकशी (Suo Moto Enquiry) करण्यात यावी अशी सूचना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) राज्य ग्राहक मंच (State Consumer Forum Maharashtra) यांना केली आहे.

ग्राहकांचा तपशील आयुक्त, वस्तु व सेवा कर माझगांव, मुंबई (GST Commissioner Mazgaon, Mumbai) यांचेकडून घेण्यात यावा असे देखील आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे. या कालावधीतील सर्व ग्राहकांना या टायर साठी वाढीव किंमत द्यावी लागली आहे. यामुळे सर्व टायर्स कंपन्यांकडुन ग्राहकांना नुकसान भरपाई (Compensation) मिळावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती राज्य अध्यक्ष ग्राहक मंच यांना लेखी पत्राद्वारे डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.

Web Title :- Dr Neelam Gorhe | State Consumer Forum-Deputy Speaker Dr. Neelam Gorhe News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ)

Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | 5 हजाराचा हप्ता घेणारा पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळयात

Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील 600 पेक्षा जास्त कर्मचारी केले जाणार कमी

SSC-HSC Board Exams | 10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेसाठी उपलब्ध होणार Question Bank; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Multibagger Sugar Stock | 27 रुपयांच्या शुगर स्टॉकने वाढवला गुंतवणुकदारांचा गोडवा, वर्षभरात 3 पट मिळाला रिटर्न