डॉ. बाबा आढाव माफी मागत नाहीत तोपर्यंत असहकार्य, दि पूना मर्चंटस् चेंबरने केला डॉ. आढाव यांच्या वक्तव्याचा निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   तोलणारांसंबधित आंदोलनादरम्यान हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी ‘दोन नंबरची संस्कृती कोरोना पेक्षा भयानक आहे’ हे विधान केले होते. या विधानाचा दि पूना मर्चंटस् चेंबरने निषेध केला असून डॉ. आढाव याप्रकरणी माफी मागत नाही तोपर्यंत हमाल पंचायतबरोबर असहकार्याची भुमिका राहील, असे निवेदन मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

पोपटलाल ओस्तवाल यांनी दिलेल्या निवेदनामध्ये डॉ. बाबा आढाव यांचे वय झाल्यामुळे त्यांचा तोल ढासळला आहे. बाजार समितीच्या आवारात काम करत असल्याने समितीची आमच्या कामावर देखरेख असते. गुळभुसार विभागातून दरवर्षी १८ कोटीपेक्षा जास्त रकमेचा भरणा होते. वारणार कामगार जेथे वाराई व हमाली ८०० ते एक हजार रुपये होते तेथे दादागिरी व अडवणूक करून दुप्पट किंवा तिप्पट आकारणी करतात. त्यांची ही दादागिरी व डमी कामगारांचा वापर याचे डॉ. आढाव यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही ओस्तवाल यांनी निवेदनात दिला आहे.