सोनहीरा कारखान्यास डॉ.पतंगराव कदम यांचे नाव 

कडेगाव : पोलीसनामा ऑनलाईन

सोनहीरा सहकारी साखर कारखान्यास डॉ.पतंगराव कदम यांचे नाव देण्याचा ठराव कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार आता ‘डॉ.पतंगराव कदम  सोनहीरा सहकारी साखर कारखाना मर्यादित मोहनराव कदमनगर वांगी ” असे कारखान्याचे नामकरण करण्यात आले. तसेच  सोनहीरा कारखाना परिसरात आमदार डॉ.पतंगराव कदम यांचे स्मारक उभारन्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B014V487W8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5fe606f1-81e3-11e8-a157-77860ad26577′]

डॉ.पतंगराव कदम यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणारे म्युजियम साकारण्यात यावे व हे स्मारक राज्यात आणि देशात आदर्शवत ठरावे  असा ठरावही सर्वानुमते मंजूर झाला. हे दोन्ही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.