डॉ. पायल तडवींच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, ती आत्महत्या नव्हे हत्याच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे. त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा वकिलांनी बुधवारी न्यायालयात केला आहे. पायल यांच्या शरीरावर काही जखमा आहेत. त्यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. किंवा काही मारहाण झाली का याचा तपास आम्हाला करायचा आहे. असे त्यांनी न्यायालायला सांगितले.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन वरिष्ठ डॉक्टरांना पोलिसांनी बुधवारी अटक करून न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यांना ३१ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यावेळी पायल तडवी यांची बाजू मांडणारे वकिल नितीन सातपुते यांनी केलेल्या युक्तीवादामुळे या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. पायलची आत्महत्या नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनीही हाच दावा केला आहे. दरम्यान तीनही डॉक्टरांचा व्हाटसअॅपचा डाटा डिलिट करण्यात आलेला आहे. तो आम्हाला परत मिळवायचा आहे. तसेच पायलच्या शरीरावर काही जखमांच्या खुणा आहेत., त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली होती का ?, किंवा मारहाण करून फाशी देण्यात आली अशी आमची शंका आहे. सध्या उभे करण्यात आलेले चित्र खोटे आहे. प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.

शवविच्छेदन करतानाही जे जे रुग्णालयातील ज्यूनियर डॉक्टरांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याचेही वकील म्हणाले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.