Dr. Rajendra Malpani | पर्यटनासाठी गेलेले डॉ. राजेंद्र मालपाणी यांचा गुजरातमध्ये मृत्यू

संगमनेर : वृत्तसंस्था – Dr. Rajendra Malpani | इंडियन मेडिकल असोसिएशन, संगमनेरचे (Sangamner) माजी अध्यक्ष, बालरोग तज्ज्ञ तसेच पर्यावरणप्रेमी डॉ. राजेंद्र केदारनाथ मालपाणी (Dr. Rajendra Kedarnath Malpani) यांचे गुजरातमधील गिरनार (Girnar in Gujarat) येथे सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने (heart attack) निधन घाले. ते 59 वर्षांचे होते. पर्यावरणप्रेमी असलेल्या डॉक्टर मालपाणी यांनी अखेर निसर्गाच्या सान्निध्यात आपली जीवनयात्रा संपवली आहे.

डॉ. राजेंद्र मालपाणी (Dr. Rajendra Malpani) यांनी नुकतेच संगमनेरमधील खांडगाव, कपालेश्वरच्या डोंगरावर वृक्षारोपण केले होते. येथील वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील गिरनार येथे मित्रांसह पर्यटनासाठी गेले होते. या ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

संयमी, मृदुभाषी डॉ. मालपाणी संगमनेर येतील बालरोग तज्ज्ञ आणि पर्यावरणपप्रमी (Pediatrician and Environmentalist) म्हणून प्रसिद्ध होते. प्रवरा नदीपात्र संरक्षणासाठी सातत्याने विरोध करत वाळू उपाशाच्या विरोधात आवाज उठवला होता. वृक्षमित्र परिवाराच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केलेले काम कौतूकास्पद आहे. तसेच डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सुद्धा त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.

Web Title :- dr rajendra malpani dies of heart attack abn

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rain | पुण्याच्या रास्ता पेठेतील केईएम हॉस्पीटलसमोर भरपावसात रिक्षावर झाड कोसळलं; चालकासह महिला जखमी (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, कोरोनाकाळात केले ‘हे’ उद्योग, जाणून घ्या प्रकरण

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या