Pune News | वंचितांच्या विकासासाठी झटणारा सच्चा कार्यकर्ता विलास चाफेकर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | जाणीव संघटना,(Awareness organization) वंचित विकास संस्थेचे संस्थापक, (Deprived Development Institutions) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते (Senior Social Worker Vilas Chafekar) विलास चाफेकर (Vilas Chafekar) यांचे आज मध्यरात्री निधन (Passed away) झाले. ते ८० वर्षांचे होते. (Pune News) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर उद्या रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वेश्या वस्तीतील (Brothel) मुलांसाठी, समाजातील वंचित घटकांसाठी, हातगाडी व्यावसायिकांसाठी, कष्टकर्‍यांसाठी, आदिवासी, (Tribal) महिला, शहरी व ग्रामीण भागातील दीनदुबळ्यांसाठी चाफेकर यांनी आपले जीवन वेचले. ज्यांना समाजाने नाकारले, अशा निरागस व अस्तित्वहीन जीवांसाठीची त्यांची धडपड आणि त्यातून उभे राहिलेले प्रगतीशील युवक आज मोठ्या संस्थांत काम करत आहेत. मानवी मूल्यांशी कधीही तडजोड न करता आणि आलेल्या संकटांना कवटाळून बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढायचा याच्यावर त्यांचा अधिक भर होता. सखोल अभ्यास, सुस्पष्ट विचार, परखड मत मांडण्याचा त्यांचा शिरस्ता होता.

ठाणेवासी मुंबईकर असलेल्या चाफेकर सरांनी मुंबई विद्यापीठात (University of Mumbai) सुवर्णपदकासह एमएची पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले.
१९७७ ला पीएचडी (PhD) करुन पुण्यातच स्थिरावले.
१९८२ ला जाणीव संघटना आणि १९८५ ला वंचित विकास संस्थेची स्थापना करुन सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवली.
वैयक्तिक प्रपंच न मांडता समाजाची, भवतालातील वंचिताची काळजी वाहणे हीच धारणा ठेवत स्वत:ला उत्तम माणूस, कार्यकर्ता आणि शिक्षक म्हणून घडविले.

सामाजिक कामाबरोबरच चाफेकर यांनी आपल्यातला कलाकार, खेळाडू, शिक्षक, पत्रकार, नाटककारही जपला होता.
शालेय जीवनापासून विद्यार्थी संघटना, ग्रामीण शेतमजुर, मुंबईतील वेश्यावस्ती, धारावी झोपड़पट्टी, आणीबाणीचा लढा, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या प्रकल्पातून त्यांनी काम केले होते.
समाजातील तळाच्या, शेवटच्या माणसापर्यंत सुखसमाधान पोहोचावे, यासाठी अखेरपर्यंत कार्यरत राहिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page , Follow us instagram 
and Twitter for every update

Web Title : true activist Vilas Chafekar passed away

Agri Produce Exporters | भारताचा जगातील टॉप-10 कृषी निर्यातदार देशांच्या यादीत समावेश, तांदूळ निर्यातीमध्ये थायलँडला टाकले पाठीमागे

Dr. Rajendra Malpani | पर्यटनासाठी गेलेले डॉ. राजेंद्र मालपाणी यांचा गुजरातमध्ये मृत्यू

Anti Corruption Trap | मानधनाचे बिल मंजूरीसाठी लाच घेणारे दोन डॉक्टर ACB च्या जाळ्यात

Pune Trains Cancelled | मुसळधार पावसामुळे पुणे- अहमदाबाद, वास्को-हजरत निजामुद्दीन, मुंबई-हैदराबाद ‘या’ एक्सप्रेससह 14 विशेष गाड्या रद्द