…तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांची परिस्थिती अधिक बिकट होत आहे. त्यामध्येच विदर्भ, मराठवाडा येथील कोरोनापासून बरे झालेल्या काही व्यक्तीमध्ये काळ्या बुरशीचा प्रकोप वाढत आहे. अशी माहिती टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी दिलीय. कोव्हीड बाधित रुग्णावर उपचार करताना स्टेरॉइडचा जास्तीचा वापर काळ्या बुरशीच्या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतो, असे डॉ. संजय ओक यांनी एका मुलाखतीत दिली आहे.

डॉ. संजय ओक म्हणाले की, मेडिकलच्या भाषेत काळ्या बुरशीला Mucor mycosis असे म्हणतात, हा आजार दुर्मिळ असून, हा तीव्र स्वरूपाचा बुरशीचा आजार आहे. मागील तीन दशकांत या पद्धतीचा आजार सामान्यपणे आढळून आलेला नव्हता. परंतु, मागील एक ते दीड वर्षांमध्ये काळ्या बुरशीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. असे ते म्हणाले. तर काळ्या बुरशीचा आजार हा डोळ्यांजवळ आणि गालावरील हाड याठिकाणी सर्वाधिक सापडतो. हा आजार तीव्र असल्याने त्याचा परिणाम म्हणजे दृष्टी जाऊ शकते, डोळा देखील काढावे लागू शकते. गालावरील हाडाजवळ हा आजार झाल्यास तो भाग काढून टाकावा लागू शकतो. तोंडाजवळ झाल्यास जबडा काढून टाकावा लागू शकतो, अशा प्रमाणे काळ्या बुरशीचा तीव्र परिणाम होऊ शकतो. अथवा मृत्यूस देखील बळी पडू शकतो. असे ओक यांनी म्हटले आहे.

तसेच, काळ्या बुरशीचा आजार हे अत्यंत पुढचे टोक आहे. परंतु, सर्वाधिक कोव्हीडचा उपचार घेतलेल्यां व्यक्तीमध्ये कँडिडा बुरशी अथवा समान प्रकारच्या बुरशीची सूक्ष्म लक्षणे सापडली आहेत. मुख्यतः म्हणजे जननेंद्रियांच्या बाजूला होणारी बुरशीजन्य संसर्ग सापडले आहेत. तर कोव्हीडवर उपचार घेतल्यानंतर अशा प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग होण्यापाठीमागे २ ते ३ करणे आहते. अनियंत्रित मधुमेह असणाऱ्या नागरिकांमध्ये हा रोग पाहायला मिळतो. कॅव्हिडच्या आजारात ९ दिवसांपेक्षा जास्त काळ स्टेरॉइड दिली गेली असतील. तर स्टेरॉइड डोसचे प्रमाण अत्यंत मोठ्या स्वरुपात असणार आहे तसेच या प्रकारचा आजार वाढू शकणार आहे. असे डॉ. ओक म्हणले. या दरम्यान. गावोगावच्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिक वेळा बैठका घेतल्या. अअनेक वेळा स्टेरॉइडबाबत डॉक्टरांच्या मनात आस्था असल्याचे दिसून येते. म्हणून याचा वापर जास्तच होत असल्याचे दिसते.

या दरम्यान, डॉ. संजय म्हणाले, नातेवाइक आणि अन्य मंडळी यांचा अनेकदा अमूक एखादे औषध देण्याविषयी आग्रह असतो. याचे एक उदाहरण म्हणजेच रेमडेसिवीर इंजेक्शन. अनेक वेळा डॉक्टर रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ इच्छित नाहीत. मात्र, नातेवाइकांकडून ते देण्याबाबत दबाव आणला जातोय, असे देखील दिसून आल्याची माहिती डॉ संजय ओक यांनी दिली आहे.