ससून रुग्णालयाचे डॉ. चंदनवाले यांच्या बदलीचा फेरविचार करावा

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले या कार्यक्षम अधिकाऱ्याच्या बदलीचा फेरविचार करावा आणि त्यांना जनतेच्या हितासाठी ससून रुग्णालयाच्या सेवेतच राहू द्यावे असे निवेदन शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

डॉ. चंदनवाले यांनी ससूनमधील वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी दररोज १६ ते १८ तास काम केले., सर्व डॉक्टर्स आणि सहकारी यांच्याशी एकोप्याचे संबंध ठेवले आणि सर्वांना ससूनमधील सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यरत केले. त्याचा फायदा असंख्य रुग्णांना मिळाला. ससूनच्या उपचारांद्वारे अनेकांना नवसंजीवनी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असे या निवेदनात म्हटले आहे.