चंद्रपूर : आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. शीतल आमटे (Dr. Sheetal Amte) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांना वरोरा उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. डॉ. शीतल आमटे(Dr. Sheetal Amte) यांनी आत्महत्या केल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांसह इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत सखोल माहिती घेण्याचे काम चालू असल्याचं सांगण्यात आलं आहे. डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे यांची मुलगी होत्या.

You might also like