डाॅ. शीतल आमटेंनी केले होते गंभीर आरोप, जाणून घ्या काय आहे ‘हे’ प्रकरण

पोलिसनामा ऑनलाइन – आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शीतल आमटे- करजगी यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, त्यांना वर्धा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटे यांच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिलं आहे. तथापि त्या सध्या मानसिक ताण, नैराश्यचा सामना करत आहेत. त्यांनी तिकडेच समाजमाध्यमांवर तशी स्पष्ट कबुली दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून सादर सतत करीत आहे. असं त्या निवेदनातून स्पष्ट केलं होतं.

आनंदमधील वाद आणि तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ व्यवस्थापनाने येउ देऊ नये आमटे यांनी स्वतः पुढाकार घेऊन या वादावर लवकरात लवकर तोडगा काढावा, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. गेल्या अनेक दशकांपासून आनंदवनची जोडलेल्या राज्यातील अनेक कलावंतांनी आमटे कुटुंबीयांशी चर्चा करून कौटुंबिक कलह थांबविण्यासाठी प्रयत्न केले होते. फक्त राज्य नाहीतर देश-परदेशातून अनेकांनी आमटे कुटुंबातील हे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला होता.

बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या निधनानंतर आनंदवनची सूत्रे, त्यांचे सुपुत्र विकास आमटे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर काही काळ कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांचा मुलगा कौस्तुभ यांची महारोगी सेवा समितीवर निवड झाली. मात्र मुलगी शीतल आमटे- करजगी यांना समितीवर स्थान दिले गेले. आमटे कुटुंबातील वादामुळे मुलाचा कारभार काढून मुलीला सोपवल्याच्या चर्चाही सर्वत्र होत्या.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये या आनंदवनाची स्थापना केली. त्यामुळे संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना या ठिकाणी आश्रय मिळाला. बाबांनी त्यांची सेवा केली. त्यांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. मात्र कुष्ठरोग्यांवर उपचार करणारे केंद्र आणि रुग्णालय होऊ नये याकडे त्यांनी लक्ष दिले होते. त्यातून त्यांनी कुष्ठरोग्यांच्या श्रमातून औद्योगिक वसाहत उभी केली. त्याचबरोबर साधना आमटे यांनी देखील कष्ट करून दोघांच्याही कष्टातून आनंदवन उभे राहिलं. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांना स्वयंपूर्ण करून जगायला त्यांनी शिकवलं.