डॉ. सुजय विखे जाणार खा. गांधी, माजी आ. राठोड यांच्या भेटीला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील हे आज दुपारी नगर मध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी खासदार दिलीप गांधी व शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच युतीतील इतर नेत्यांना भेटून पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सुजय विखे यांना जरी खासदार गांधी यांना भेटण्याची इच्छा असली, तरी गांधी हे त्यांना भेट देणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. देवी के नगर मध्ये दाखल झाल्यानंतर विळद घाट येथे त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे, असे सांगितले. ‘मी आज जरी भाजपात आलो असलो, तरी सर्व नेते व कार्यकर्त्यांसोबत जुने संबंध आहेत. त्यांच्या पुन्हा भेटीगाठी घेतल्या जातील. पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल’, असे म्हणाले.

ह्याहि बातम्या वाचा –

‘ मावळमध्ये नवखा उमेदवार आला , तर त्याला सांभाळून घ्या ‘ : अजित पवारांचं भावनिक आवाहन

नाना पटोलेंना माझा आशिर्वाद : नितीन गडकरी

विखे पाटलांच्या पत्रकार परिषदेतील ‘हे’ आहेत महत्वाचे पाच मुद्दे

बाळासाहेब थोरातांना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही , ते काही हायकमांड नाहीत

#Loksabha : उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार

You might also like