डॉ. सुजय विखेंनी दीड वर्षापूर्वी पोलिसांना लाच दिली : अरुण कडू यांची एसपींकडे (SP) तक्रार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार यांनी सुमारे दीड वर्षापूर्वी पोलिसांना सहकार कायद्याची कुठलीही परवानगी न घेता मोफत साखर वाटप केली होती. कुणाचीही परवानगी न घेता परस्पर विखे यांचा साखर वाटपाचा प्रयत्न म्हणजे प्रशासनाला लाच देण्याचा प्रकार होता, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांनी केला आहे. याबाबत कडू यांनी पोलीस अधीक्षक व लोणी पोलीस ठाण्याकडे लेखी तक्रार केली आहे.

याबाबत बोलताना कडू म्हणाले की, डॉ. सुजय विखे ज्या साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, त्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दीड वर्षांपूर्वी नगर येथील पोलिसांना दिवाळीनिमित्त मोफत साखरेचे वाटप केले होते. प्रशासनाला हाताशी धरण्यासाठी विखे यांची प्रयत्न होता. त्यावेळी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता परस्पर मोफत साखर वाटप केली. हा प्रकार म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दीड वर्षे अगोदरच प्रशासनाला लाच देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

कडू पाटील यांनी केलेली ही तक्रार डॉ. सुजय विखे यांच्या अडचणीत भर घालणारी ठरणार आहे. सदर तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्यास विखे यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.