डॉ. सुजय विखे दिलीप गांधींच्या भेटीला अर्धा तास बंद खोलीत गुफ्तगू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी आज खा. दिलीप गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तब्बल अर्धा तास दोघांनी बंद खलीत गुफ्तगू केले. त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र, सुवेंद्र गांधी यांनी उमेदवारी करू नये, यासाठी विखे पिता-पुत्रांकडून प्रयत्न सुरू आहेत.

दोन दिवसापूर्वी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज दुपारी  डॉ. सुजय विखे हे खा. गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. औपचारिक भेटीनंतर सुजय विखे यांनी खा. गांधी यांच्यासोबत सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नसला, तरी सुवेंद्र गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवू नये, यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न विखे कुटुंबियांकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसापूर्वी खा. गांधी यांच्या भेटीला आले होते. त्यानंतर पुन्हा आज सुजय विखे हे भेटीला आले आहेत.

लोकसभा निवडणुकीत सुवेंद्र यांनी उमेदवारी केल्यास विखे यांना मोठा फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यामुळे विखे पिता-पुत्रांकडून गांधी यांचे उंबरडे झिजविले जात आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like