डॉ. सुजय विखे पुन्हा मुंबईला !

उलट-सुलट चर्चेला उधाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे पाटील नगरमधील स्थानिक नेत्यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. ते मुंबईत काही नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते. मात्र मुंबईतून नगरला आल्यानंतर लगेच पुन्हा मुंबईला गेल्यामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

डॉ. सुजय विखे-पाटील हे कालच नगरला आले होते. नगरला आल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांची व इतर नेत्यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केल्यानंतर ते आज पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याच्या दिवशा व आणखी एक असे दोन दिवस डॉ. विखे पाटील हे मुंबईत तळ ठोकून होते. त्यानंतर गुरुवारी हेलिकॉप्टरने विखे हे नगरला दाखल झाले. मात्र आज पुन्हा ते मुंबईला रवाना झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.

डॉ. सुजय विखे हे रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी गेले आहेत, असे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे वेगळी चर्चा सुरू झाली आहे. खा. दिलीप गांधी यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यानुसार जैन समाज गांधी यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. कदाचित त्यामुळेच तर डॉ. सुजय विखे हे मुंबई गेले असावेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दुसरीकडे खासदार दिलीप गांधी हे अस्वस्थ झाले आहेत. मात्र त्यांच्याकडून अजून आशा सोडलेली नाही. आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना अजूनही आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us