ट्विटरवर मिळाली नाही ‘मदत’ ! रेल्वेच्या टॉयलेटमध्ये लपून वाचवले माजी आमदाराने ‘प्राण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा करण्यात आलेल्या असतात. रेल्वे प्रशासन याविषयी मोठे मोठे दावे करत असते. मात्र प्रत्यक्षात दिव्याखाली अंधार अशी अवस्था रेल्वे प्रशासनाची आहे. अनेक प्रवाशांना आपल्या जीवाचा धोका असताना देखील प्रवास करावा लागतो. सुनिल प्रभू रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वे प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. ट्विटरवर प्रवाशांनी आपली समस्या सांगितल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्या प्रवाशाला रेल्वेकडून मदत केली जायची.

ट्विटर पर नहीं मिली मदद! नेता ने ट्रेन के टॉयलेट में छुपकर बचाई जान

असाच प्रकारात मध्यप्रदेशमधील माजी आमदार डॉ. सुनीलम यांना विचित्र अनुभव आला. सोमवारी रात्री गोंडवाना एक्सप्रेसमधील एसी कोचने प्रवास करत असताना एका गुंडापासून आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना रेल्वेतील टॉयलेटमध्ये लपावे लागले. एसी कोचमधील एका गुंडाने माजी आमदार डॉ. सुनीलम यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेतील टायलेटमध्ये स्वतःला कोंडून घेतले. त्यानंतर त्यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून आपल्याबरोबर घडलेल्या या घटनेची माहिती दिली.

ट्विटर पर नहीं मिली मदद! नेता ने ट्रेन के टॉयलेट में छुपकर बचाई जान

या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि, सोमवारी रात्री निजामुद्दीन ते मुलताई कडे जाणाऱ्या गोंडवाना एक्सप्रेस मधील एसी कोचमधून ते प्रवास करत होते. यावेळी बिना नावाच्या स्टेशनवर एक युवक आरती नावाच्या मुलीसह या डब्यात चढला. त्यावेळी प्रवासादरम्यान त्याने या माजी आमदारांविरोधात अनेक वेळा गैरव्यवहार केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर देखील याविषयी तक्रार केली. मात्र त्यावर देखील काहीही कारवाई करण्यात आली नाही. बिनावरून भोपाळपर्यंत येण्यासाठी दोन तास लागले. मात्र या दोन तासात त्यांना ट्विटरवर काहीही उत्तर मिळाले नाही.

ट्विटर पर नहीं मिली मदद! नेता ने ट्रेन के टॉयलेट में छुपकर बचाई जान

याच दरम्यान त्याचे काही साथीदार देखील रेल्वेत चढले. यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी रेल्वेच्या टॉयलेटमध्ये स्वतःला बंद करून घेतले. जितक्या वेळ गाडी रेल्वे स्थानकात उभी होती तितका वेळ तो युवक आणि साथीदार टॉयलेटच्या दरवाज्यावर लाथ मारत होते. मात्र यादरम्यान कुणीही सुरक्षा रक्षक तिकडे फिरकला नाही. डॉ. सुनीलम हे मध्यप्रदेशमधील मुलताई विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी हे पत्र पाठवतानाच आरोप केले आहे कि, ट्विटर हॅण्डल हे फक्त दिखावा आहे. यावर विनंती केल्यास कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्याचबरोबर या युवकावर तसेच त्याच्या साथीदारांवर लवकरात लवकर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी या माजी आमदारांनी केली आहे.

ट्विटर पर नहीं मिली मदद! नेता ने ट्रेन के टॉयलेट में छुपकर बचाई जान

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी