Dr. Suresh Jadhav | लस निर्मितीमध्ये महत्वाचं योगदान देणारे ‘सिरम’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr. Suresh Jadhav | सिरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव (Dr. Suresh Jadhav) यांचं निधन (Died) झालं आहे. ते 71 वर्षाचे होते. सुरेश जाधव यांनी आज (बुधवारी) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. जाधव यांच्या जाण्यामूळे भारतीय वैद्यकिय क्षेत्राची अपरिमित हानी झाली असल्याची भावना औषध निर्माण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

 

डॉ. सुरेश जाधव (Dr. Suresh Jadhav) यांचे कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लशीच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान आहे. डॉ. जाधव हे बुलढाण्यासारख्या छोट्या गावातून पुण्यात आले. त्यांनी भारतातील लस संशोधनात जागतिकस्तरावर कामातून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्यामुळे त्यांना भारतीय लस संशोधनातील भिष्माचार्य म्हटले जात. त्यांच्या नावे जगातील अनेक पेटंटची नोंद आहे.

दरम्यान, सन 1979 पासून सिरम इन्स्टिट्यूट येथे रुजू झाले. ते सिरम इन्स्टिट्यूटचे 1992 पासून कार्यकारी संचालक म्हणून काम पाहू लागले. तसेच, डॉ. जाधव यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीमध्ये ‘पीएच. डी.’ घेऊन 1970 पासून 50 वर्षांची अखंड सेवा दिली. त्यांचा कार्यकाल मार्च 2022 पर्यंत असला तरी आरोग्यविषयक कारणामुळे त्यांनी ऑक्टोबरमध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.

 

Web Title :- Dr. Suresh Jadhav | Serum’s Executive Director Dr. Suresh Jadhav passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shilpa Shetty | ‘अक्कल’ बदाम नाही तर धोका खाऊन येते, ‘या’ व्यक्तीने दिला शिल्पा शेट्टीला सल्ला; पाहा व्हिडीओ

RBI Alert | तुमच्याकडील 500 रुपयांची हिरव्या पट्टीची ही नोट बनावट आहे का? याबाबत RBI ने दिली महत्वाची माहिती

Pune Crime | कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लिमीटेडकडून 100 जणांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून शिरीष खरात याला नाशिकहून अटक

PM Kisan | ‘या’ शेतकर्‍यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये, जाणून घ्या सरकारचे नवीन नियम

Anti Corruption Bureau Maharashtra | 10 लाखाचे लाच प्रकरण ! पोलिस अधिकाऱ्यासह तिघे अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलिस दलात खळबळ

Sanjay Raut | शिवसेना UPA मध्ये सहभागी होणार? राहुल गांधींच्या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले…

Pune Crime | पुण्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर उर्फ लालबादशाह खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दररोज 334 रुपयांची गुंतवणूक ! काही वर्षात मिळू शकते 15 लाखापेक्षा जास्त रक्कम, समजून घ्या – गणित