Dr. Swapna Patkar | बोगस पदवी प्रकरणात डॉ. स्वप्ना पाटकर यांना वांद्रे पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बोगस डॉक्टर पदवी प्रकरणात सायकॉलिजिस्ट आणि चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर (Dr. Swapna Patkar) यांना वांद्रे पोलिसांनी मंगळवारी (दि. 8) अटक केली आहे. त्यांना उद्या बुधवारी (दि. 9) रिमांडसाठी कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या गुरदीप कौर यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार तपास अधिकारी पीआय पद्माकर देवरे यांनी डॉ. पाटकर यांच्याविरोधात जबाब दाखल करून गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, कानपूर विद्यापीठाच्या बनावट पदवीबाबत हे प्रकरण आहे. त्याठिकाणाहून डॉ. पाटकर (Dr. Swapna Patkar) यानी डॉक्टरेट पदवी मिळविल्याचा दावा तक्रारदार गुरदीप कौर यांनी केला आहे. कानपूर विद्यापीठातील छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालयातून 2009 मध्ये नमूद विषयात पीएचडी केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले. त्यानंतर 2016 किंवा त्यापूर्वी त्या लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ऑनररी कन्सल्टन्ट म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी ती बनावट कागदपत्रे सादर केली होती. स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याची तक्रार कौर यांनी केली होती. त्यानुसार डॉ. पाटकर (Dr. Swapna Patkar) यांना अटक केली असून वांद्रे पोलीस तपास करत आहेत.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

PM मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंनी साधला निशाणा, म्हणाले…

 

संतापजनक ! 70 वर्षाच्या नराधमाकडून 10 वर्षाच्या मुलीवर घरात घुसून लैगिंक अत्याचार, कोंढव्यातील घटना