Dr. Tanaji Sawant | बंधारे बांधून तीनशे हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार – डॉ. तानाजी सावंत

मुंबई : Dr. Tanaji Sawant | रायगड जिल्ह्यातील (Raigad District) पहुर येथे बंधारा उभारणीबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. या बंधाऱ्यामुळे त्या परिसरातील ३०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती मंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant ) यांनी विधानसभेत (Vidhansabha) दिली.

विधानसभा सदस्य अमीन पटेल (MLA Amin Patel) यांनी पहूर कालव्यासाठी भूसंपादन न केल्यामुळे कालव्याअभावी सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला.

मंत्री सावंत (Dr. Tanaji Sawant) म्हणाले की, पहूर कालव्याच्या भूसंपादनात स्थानिक शेतकऱ्यांनी सतत
विरोध केला असल्यामुळे भूसंपादन करणे आतापर्यंत शक्य झाले नाही.
सद्यस्थितीत दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरिडॉर Delhi Mumbai Industrial Corridor (DMIC)
साठी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमीन संपादित झाली असल्याने सिंचन करणे शक्य नाही.
भविष्यात डीएमआयसी कडून पाण्याची मागणी प्राप्त झाल्यास सदर पाणीसाठा हा औद्योगिक
वापरासाठी डीएमआयसीला देणे किंवा हा प्रकल्प मालकी हक्काने डीएमआयसीला हस्तांतरित करून प्रकल्प
खर्चापेक्षा जास्त महसूल गोळा करणे शक्य आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), सदस्य अशोक चव्हाण (Ashok Chavan),
हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी सहभाग घेतला.

Web Title : Dr. Tanaji Sawant Three hundred hectares of land will be brought under irrigation by building dams – Dr. Tanaji Sawant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalyukt Shivar Abhiyan | जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुणे जिल्ह्यातील 187 गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – देवेंद्र फडणवीस

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit | अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित