डॉ. आंबेडकरांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची 100 फुटाने वाढवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. बाबासाहेब आंबेडकरस्मारकातील पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित घोषणा केली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अजित पवार म्हणाले की डॉ. बाबासाहेब स्मारकातील पुतळ्याची उंची 100 फुटाने वाढवण्यात येणार आहे. स्मारक विभागाच्या सर्व परवानग्या 8 दिवसात देण्यात येतील असेही अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की 2 वर्षात स्मारकातील पुतळ्याचे बांधकाम पूर्ण करणार आहोत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येईल. स्मारकांसाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही. देखणं, दिमाखदार स्मारक उभारण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

त्यामुळे आता दादर येथील इंदू मिल जागेवरील डॉ. बाबासाहेब स्मारकातील पुतळ्याची उंची 100 फुटाने वाढवण्याचा सुधारित प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने आता नवं सरकार येणाऱ्या काळात किती कालावधीत पूर्ण करणार हे भविष्यात कळेल. स्मारकाच्या पुतळ्याची उंची 350 फुट असेल. तर स्मारकांची एकूण उंची 450 फूट असेल अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. मुर्तीकार राम सुतार यांच्या हस्ते या स्मारकाचे काम होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/