डाॅ. शकुंतला काळेंचा प्रेरणादायी प्रवास, दहावीनंतर लग्न आता शिक्षण बोर्डाच्या अध्यक्ष

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

एखादी व्यक्ती जर जिद्द आणि चिकाटीने पेटून उठली तर असाध्य ती गोष्ट साध्य करू शकते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी देखील सर्वांना गर्व वाटेल असे काम केले आहे. त्यामुळे शकुंतला काळे यांचा प्रवास तरुणांईसाठी प्रेरणादायी आहे. ज्यावेळी त्या चाैथीच्या वर्गातमध्ये शिकत होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची आई मोलमजूरी करुन परिवाराचे पालण पोषण करत असे. त्यावेळी गावामध्ये शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्युळे शिक्षणासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागत असे. अशावेळी शकुंतला यांचे लग्न 14 व्या वर्षीच करण्यात आलं. त्यावेळी त्या फक्त दहावीची परिक्षा पास झाल्या होत्या. अशा परिस्थिती देखील त्यांनी संयम, चिकाटी व शिकण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवले आणि आपले स्वप्न साकार केले. शुक्रवार (8 जून) या दिवशी शकुंतला काळे यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या अध्यक्ष म्हणून दहावीचा निकाल जाहिर केला तेव्हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या त्यांच्या गावातील लोकांना किती अभिमान वाटला असेल.

एकत्रीत कुटूंबात लहान मुलांसोबत चालू ठेवले शिक्षणः

कमी वयातच लग्न झाल्यानंतर काळे यांना सासरी एकत्रीत परिवार मिळाला. त्यानंतर त्या दोन मुलाच्या आई झाल्या. काळे सांगतात त्या काळी महिलांना काम करण्यासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर जाण्याची परवानगी मिळत नव्हती. पुढे त्यांनी पती व सासऱ्यांच्या मदतीने बाहेरून शिक्षणाला सुरुवात केली त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विषयातून मास्टर्स डिग्री पूर्ण केली. ज्या शाळेत काळे यांनी शिक्षण घेतले त्याच शाळेत त्यांनी अध्यापनाच्या कामास सरुवात केली.

रेडिअो एेकूण सामान्य ज्ञानाचा केला अभ्यासः

शैक्षणिक सोई-सुविधांची कमतराता असताना काळे यांनी आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर त्यावर मात केली. रेडिअो वरील विविध प्रकारचे कार्यक्रम एेकूण त्या आपले सामान्य ज्ञान वाढवत असत. ज्यावेळी त्यांनी स्पर्धा परिक्षा देण्याचे ठरवले तेव्हा पुस्तके देखील त्यांच्याकडे नव्हती. त्यावेळी घरकाम करत असताना रेडिअोवर बातम्या एेकूत असत. रेडिअोवर बातम्या लागल्या की त्यांचा मुलगा पळत येऊन त्यांना सांगत असे.

काळे सांगतात की शाळेतून आल्यानंतर घरातील काम करुन अभ्यास करत असत. अशा व्यस्त कामातून केवळ चार तासच झोपण्यासाठी वेळ मिळत असे. एवेढेच नाही तर पहाटे तीन वाजता पाणी भरण्यासाठी उठावे लागत असे. आलेल्या अनेक संकटावर मात करत 1993 साली त्या एमपीएससी ची परिक्षा पास होवून सोलापूर शिक्षण विभागात रुजू झाल्या.पुढे 1995 मध्ये त्या महिला शिक्षण आणि विस्तार विभागाच्या अध्यक्ष बनल्या. त्या अभिमानाने सांगतात की ज्या वर्षी त्यांनी पीएचडी पूर्ण केली ते आंतरराष्ट्रीय महिली वर्ष होते. शिक्षण विभागातील विविध ठिकाणी काम केल्यानंतर 25 डिसेंबर 2017 रोजी राज्य बोर्डाच्या अध्यक्ष बनल्या. त्यामुळे डाॅ. शकुंतला काळे यांचा प्रवास सर्वांना एक प्रेरणा देणारा आहे.