स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. उद्धव भोसले

नांदेड: पोलीसनामा ऑनलाईन – प्राचार्य डॉ. उद्धव भोसले यांची नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरू पदाची ही निवड राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी एका आदेशानुसार डॉ. उद्धव भोसले यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी डॉ. पंडीत विद्यासागर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते. त्यामुळे काही काळाकरिता आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र आता भोसले यांची निवड कुलगुरूपदी करण्यात आली आहे.

संतापजनक….! म्हणून त्यांनी चक्क शाळेतच विद्यार्थिनींचे कपडे उतरवले

कोण आहेत डॉ. उद्धव वेंकटराव भोसले
डॉ. उद्धव वेंकटराव भोसले यांचा जन्म २४ जानेवारी १९६७ रोजीचा आहे. ते ५१ वर्षाचे आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून इलेक्ट्रोनिक्स विषयात बी.ई. तसेच एम.ई. केले असून आयआयटी मुंबई येथून ईलेक्ट्रीकल इंजिनिअरींग या विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.