डाॅ. वानखेडे यांच्या निधनाने कुंजीरवाडीत हळहळ

थेऊर : कुंजीरवाडी येथील वैद्यकीय व्यवसायातील सुप्रसिद्ध डाॅ.प्रभाकर वानखेडे यांचे आकस्मिक निधन झाले त्याच्या अशा अचानक जाण्यामुळे सर्व पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा धक्का बसला असून कुंजीरवाडीत शोककळा पसरली आहे.

जगावर कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे आता तिच्या विळख्यात अनेकजण येत असून नामांकित व्यक्ती याच्यामुळे मृत्यू पावत आहेत.कुंजीरवाडी येथील डाॅ.वानखेडे हे खुपच प्रसिद्ध व लोकांच्या विश्वासात उतरलेले होते.त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली होती त्यांनी हा व्यवसाय न करता ती सेवा या वृत्तीने वागले.गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला हे डाॅक्टर आपले असल्याचा अनुभव येत असे.

गेली दहा दिवस त्यांनी लढा दिला.गावातील व आजुबाजुच्या गावातील अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या पण काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, नायगाव, सोरतापवाडी या गावावर अक्षरशः शोककळा पसरली आपला मसिहा हरवल्याची प्रतिक्रिया कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता संदीप धुमाळ यांनी व्यक्त केली.