ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन

मुंबई : वृत्तसंस्था

ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

जयवंत नाडकर्णी यांनी नाट्यक्षेत्रात वेगळा ठसा उमटवला होता. ज्येष्ठ नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक यांचे ते पट्टशिष्य होते. याशिवाय, शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिकलो मी हरलो, वतुर्ळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी ही त्यांची प्रमुख नाटके होती.

याबरोबरच ज्येष्ठ कलाकार,दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या रंगायन या नाट्यसंस्थेच्या स्थापनेपासून रंगायनने सादर केलेल्या प्रत्येक नाट्य कलाकृतीत जयवंत नाडकर्णी यांचा प्रामुख्याने सहभाग होता.