दृष्टी धामीनं वेडिंग अ‍ॅनिवर्सरीनिमित्त शेअर केला पतीला लिपलॉक ‘KISS’ करतानाचा फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस दृष्टी धामी आणि तिचा पती नीरज खेमका यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहे. या निमित्तानं दृष्टीनं इंस्टाग्रामवरून एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिनं खास मेसेजही लिहिला आहे. खास बात अशी की, या फोटोत दृष्टी पती नीरजला लिपलॉक किस करताना दिसत आहे.

दृष्टीनं पती नीरजला किस करतानाचा फोटो तिच्या इस्टावरून शेअर केला आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये दृष्टी म्हणते, “तेव्हाही प्रेम होतं, आजही प्रेम आहे. कायम प्रेम केलं आहे आणि कायम करत राहणार. आपल्या दोघांच्या या पाचव्या वर्षांच्या शुभेच्छा. हॅप्पी अॅनिवर्सरी”

मिळालेल्या माहितीनुसार दृष्टीचा हा लिकलॉक किसिंग वाला फोटो स्पेनच्या वॅकेशनचा आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं पती नीरजसोबत रोमँटीक हॉलिडेचा आनंद घेतला होता.

दृष्टी धामी आणि नीरज खेमका यांनी दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर 21 फेब्रुवारी 2015 रोजी लग्न केलं होतं. रिपोर्टनुसार दृष्टी आणि नीरज यांनी तब्बल 6 वर्ष एकमेकांना डेट केलं आहे.

दृष्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दिल मिल गए, गीत हुई सबसे पराई, मधुबाला एक इश्क एक जुनून , एक था राजा एक थी रानी, परदेस में है मेरा दिल यांसारख्या अनेक मालिकेत काम केलं आहे. तिनं सिलसिला या मालिकेतही काम केलं आहे. घरगुती हिंसाचारानं पीडित नंदिनीचा तिनं साकारलेला रोल लोकांना खूप आवडला. यासाठी तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. नंतर तिनं शो सोडला होता.