मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा; धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने नोंद घेवून उपाययोजना कराव्यात अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जयंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज (बुधवार) केली आहे.

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये विशेषतः मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्याचा फटका तेथील शेतकऱ्यांना बसला आहे. अगोदरच वेळेत न मिळालेले पीक कर्ज आणि अन्य कारणांमुळे शेतकरी अडचणीत आला होता. तो आता हवालदिल झाला आहे. मराठवाड्यात सरासरी पाऊस कमी झाला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती भीषण झाली. या ही स्थितीत शेतकऱ्यांनी जी पीके पिकविली ती वेगवेगळ्या रोगांनी बाधित झाली आहेत. एकूणच मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस, मका, सोयाबीन, धान, ज्वारी आणि अन्य पिकांचे नुकसान झाले आहे असे मुंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f14a70de-c172-11e8-8836-fdb5e9decf40′]
पिकांचे पंचनामे तातडीने करून पीक पैसेवारी १५ दिवसात जाहीर करावी. मराठवाड्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा. पाण्याची टंचाई लक्षात घेवून टँकरचे नियोजन युद्धपातळीवर करावे, चारा डेपो- चाऱ्याच्या उपलब्धततेसाठी उपाययोजना करावी. कीड रोग प्रतिबंधक योजना प्रभावीपणे राबवाव्यात. जायकवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याच्या पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांना किमान पाच पाणी पाळ्या मिळतील अशी व्यवस्था व्हावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
[amazon_link asins=’B06XFLY878,B071JWBFDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff4c67f7-c172-11e8-9a64-cfbeeed0911c’]