DRDO Recruitment 2021 : 10 वी पास उमेदवारांसाठी अप्रेंटिसशिपची संधी; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) दहावी पास किंवा ITI डिप्लोमाधारकांना अप्रेंटिसशिपची संधी दिली जात आहे. या विभागात 79 पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवार आपल्या आवडत्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू शकता.

DRDO कडून 79 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 17 मे नियोजित करण्यात आली आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी आत्तापर्यंत अर्ज केला नाही अशा उमेदवारांना drdo.gov.in वर जाऊन ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता.

या ट्रेड्समध्ये होणार भरती…

– फिटर – 14

– इलेक्ट्रिशियन – 10

– इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक – 09

– सेक्रेटेरियल असिस्टंट – 08

– वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 07

– मशिनीस्ट – 06

– डिजिटल फोटोग्राफर – 06

– कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टेंट (COPA) – 05

– टर्नर – 04

– कारपेंटर – 03

– मॅकेनिक (मोटर वाहन) – 03

– कॉम्प्युट आणि हार्डवेयर मेंटनन्स मॅकेनिक – 02

– स्टेनोग्राफर (हिंदी आणि इंग्रजी) – 02

उमेदवार दहावी पास असावा

उमेदवार दहावी पास किंवा ITI डिप्लोमाधारक असावा. अर्ज करताना किमान वय 14 वर्षे असावे. मेरिटच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. 8,050 किंवा 7,700 रुपये स्टायपेंड दिला जाईल.