DRDO ने बनवले युद्धनौकांचे कवच; शत्रूची क्षेपणास्त्रे स्पर्श करू शकणार नाहीत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) एक कवच तयार केले आहे, जे भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचा शत्रूच्या क्षेपणास्त्रापासून बचाव करेल. या सिस्टीमचे नाव आहे ‘Advanced Chaff Technology’. या DRDO ला जोधपूर लॅबोरेटरी ने विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचे तीन प्रकार तयार केले गेले आहेत. लहान श्रेणी, मध्यम श्रेणी आणि लांब श्रेणीचे Chaff रॉकेट. हा Chaff रॉकेट काय आहे? जाणून घ्या.

लढाऊ जहाजांमध्ये Chaff रॉकेट लावण्याचा फायदा असा आहे की जेव्हा ते प्रक्षेपण केले जातात तेव्हा शत्रूंची क्षेपणास्त्र याला आदळून हवेमध्ये स्फोट होतो. त्यामुळे लढाऊ जहाजांचा बचाव होतो. हे असे उपकरण आहे, जसे की फायटर जेट्समध्ये अँटी-मिसाईल फ्लेयर सिस्टीम असते. म्हणजेच क्षेपणास्त्र येत असताना दिसल्यास अँटी फ्लेयर सिस्टीम जेटच्या मागे आग सोडते. याला धडकून मिसाईल नष्ट होते.

अँटी-मिसाईल फ्लेयर सिस्टीमप्रमाणे Chaff टेक्नॉलॉजी रॉकेटचे मिसाईल येत असताना पाहून हवेत उडून जातात. हे दुष्मनांच्या क्षेपणास्त्रांना जहाजापासून दूरवर नष्ट करते. भारतीय नौसेने DRDO द्वारे बनवल्या गेलेल्या Chaff रॉकेटच्या तीन प्रकारांच्या चाचण्या अरबी समुद्रात केल्या आहे. सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहे. भारतीय नौदलाचे अधिकारी या तंत्रज्ञानावर समाधानी आहेत, कारण हे युद्धनौका शत्रूंच्या क्षेपणास्त्रांपासून वाचवू शकते.

Advanced Chaff Technology रॉकेट एक इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर टेक्नॉलॉजी आहे. याचा वापर संपूर्ण जगात होतो. याचे कनेक्शन जहाजावर लावलेले मिसाईल ट्रेकर सिस्टीमसोबत होते. जेव्हा शत्रूचे क्षेपणास्त्र जहाजाजवळ येत असेल तेव्हा हे हवेमध्ये क्षेपणास्त्राला नष्ट करते.

Advanced Chaff Technology रेडिओ फ्रिक्वेन्सीला ट्रेक करते, अथवा हिट सेन्स करून अथवा इन्फ्रारेड टेक्नॉलॉजीला सेंस करून हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राला नष्ट करते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. हे तंत्रज्ञान आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत विकसित केले गेले आहे.

प्रगत Chaff तंत्रज्ञानाचा वापर शत्रूंच्या हल्ल्याना फसवण्यासाठी केला जातो. म्हणजेच, जर शत्रूने आपल्यावर कोणत्याही प्रकारचा हवाई हमला केला, म्हणजे क्षेपणास्त्र अथवा रॉकेटने केला तर आपण या तंत्रज्ञानाद्वारे त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो किंवा आपण त्याचा स्फोट करू शकतो. त्यामुळे शत्रूच्या हत्याराचा नायनाट होईल.