७ व्या वेतन आयोगानुसार ‘DRDO’ मध्ये ३५१ पदांची मेगाभरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संरक्षण मंत्रालयाच्या अधीन काम करणारी संस्था डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन म्हणजेच डीआरडीओ (DRDO) मध्ये मोठी भरती निघाली असून १० वी पास युवकांसाठी हि मोठी संधी आहे. डिप्लोमा आणि आयटीआय प्रमाणपत्र असणारे इच्छूक उमेदवार या पदांसाठी आवेदन करू शकतील. डीआरडीओ कडून आलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार ‘टेक्निशियन-A’ या पदासाठी ३५१ लोकांची भरती होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी निवड होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार भरभक्कम वेतन मिळणार आहे.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे डीआरडीओ च्या अधिकृत जाहिरातीमध्ये असे स्पष्ट केलेले आहे कि जर एमएस्सी, बीई ,बीटेक, पीएचडी सारखे उच्च शिक्षण घेतलेले असेल तर अशा उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करू नये. त्यामुळे याठिकाणी स्पर्धादेखील कमी असणार आहे. इच्छूक उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.

या जाहिरातीबद्दल अधिकची माहिती :

शैक्षणिक पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI.

वयाची अट : २६ जून २०१९ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ESM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जून २०१९ (सायंकाळी ५ पर्यंत)

अर्ज करण्यासाठी लिंक : https://ceptam09.com/

अधिक सविस्तर माहिती http://www.drdo.gov.in या DRDO च्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

सिनेजगत

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’