‘DRDO’ मध्ये 1000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, 10 वी पास उमेदवार करु शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये (DRDO) सरकारी नोकरीची संधी उपल्बध आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी 1,817 जागा रिक्त आहेत. त्यामुळे तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची सुरुवात 23 डिसेंबरपासून होईल.

पदांचे नाव, संख्या –
1. मल्टी टास्किंग स्टाफ – 1,817 पद

वयोमर्यादा –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 25 वर्ष असावे.

महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 जानेवारी 2020 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांचे किमान शिक्षण 10 वी पास तरी असावे. तसेच त्याबरोबर आयटीआय पास असणे आवश्यक असेल. या संबंधित अधिक माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया –
या पदांवर अर्ज करण्याची उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. उमेदवारांनी संपूर्ण माहिती वाचून अर्ज करावेत. यासाठी उमेदवारांना https://www.drdo.gov.in/home या वेबसाइटला भेट द्यावी. उमेदवार या वेबसाइटवरुन ऑनलाइन अर्ज करु शकतात.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like