सरकारी नोकरी ! ‘इथं’ 12 वी पास उमेदवारांना मिळणार 7 व्या वेतन आयोगानुसार पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने एडमिनिस्ट्रेटिव असिस्टेंट, स्टोर असिस्टेंट आणि इतर पदांसाठी 224 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. यासाठी तुम्ही  www.drdo.gov.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करु शकतात. त्यासाठीची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर असणार आहे. तर अर्ज करण्याची सुरुवात 21 सप्टेंबरपासून होणार आहे.

एकूण 224 जागांच्या या भरतीसाठी 10 वी, 12 वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. 12 पास असलेले आणि निवड झालेल्या उमेदवाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. 

वेतनमान –
एडमिनिस्ट्रेटीव असिस्टेंट, स्टोर असिस्टेंट आणि इतर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे वेतन 19900 – 63200/-, 25500 – 81100/-  रुपये असेल.
परिक्षा शुल्क –
1. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग देशातभरात कोठेही होईल. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. 
2. यात सर्व कॅटेगिरीच्या उमेदवारांसाठीची 100 रुपये परिक्षा शुक्ल असणार आहे. महिला, एससी एसटी, पीडब्ल्यूडी आणि ईएसएम उमेदवारांना परिक्षा शुल्क नसेल. 
3. उमेदवार परिक्षा शुल्क ऑनलाइन भरु शकतात. 

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like