DRDO नं पिनाक रॉकेटची केली यशस्वी चाचणी; क्षणात शत्रूला करू शकते ‘खाक’ (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) आज पिनाक रॉकेट (Pinaka missile) ची यशस्वी चाचणी केली. हे इतके शक्तीशाली आहे की, अवघ्या 44 सेकंदात 12 रॉकेट फायर करू शकते. डीआरडीओकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, ओडिसा किनार्‍याजवळ चांदीपूर एकात्मिक चाचणी क्षेत्रात ही यशस्वी चाचणी करण्यात आली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

डीआरडीओने म्हटले की, पिनाक एक फ्री फ्लाईट आर्टिलरी रॉकेट सिस्टम आहे, याची रेंज 37.5 किलोमीटर आहे. पिनाक रॉकेट्सला मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरने जोडले जाते. ही मिसाईल सिस्टम भारत आणि पाकिस्तान (India, Pakistan) लगतच्या सीमेवर तैनात करण्याच्या हेतुने बनवले आहे. हे कमी तीव्रता सारख्या युद्धात वापरण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. आणि सैन्य (Military) क्षमता जबरदस्त वाढवते.

पिनाकवर एक दृष्टीक्षेप…
पिनाक मुळरूपात मल्टी-बॅरल रॉकेट सिस्टम आहे. याच्यातून केवळ 44 सेकंदात 12 रॉकेट डागले जाऊ शकतात.
डीआरडीओने म्हटले, पिनाक सिस्टमच्या एका बॅटरीत 6 लाँच व्हेईकल असतात, सोबतच लोडर सिस्टम, रडार आणि लिंक विथ नेटवर्क सिस्टम आणि एक कमांड पोस्ट असते.
एका बॅटरीद्वारे 1×1 किलोमीटर भागाला पूर्णपणे उध्वस्त करता येऊ शकते.
यास भगवान शंकरांचे धनुष्य ’पिनाक’च्या नावाने विकसित करण्यात आले आहे.

Web Title :- drdo successfully test fired advanced pinaka rocket

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’