निकालाआधीच शिवसेनेला मंत्रीपदाची ‘स्वप्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज संध्याकाळी एनडीएतील मित्र पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकिनंतर मित्र पक्षांना मेजवानी देण्यात येणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.
अमित शहांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये सरकार स्थापनेविषयी चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात भाजपाचा मित्र पक्ष असलेला शिवसेना या बैठकीदरम्यान कॅबीनेट आणि राज्यमंत्रीपदाची मागणी करु कशतो. शिवसेनेकडून ३ कॅबीनेट आणि २ राज्यमंत्री पदांची मागणी होऊ शकते. अशी चर्चा सध्या आहे.
शिवसेना भाजपाचा मित्रपक्ष असून निवडणुकीपूर्वी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा शिवसेनेने केली होती. मात्र, नंतर भाजपा आणि शिवसेनेत युती झाली. एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांना समान जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना १७ आणि भाजपा १७ जागांवर विजयी होईल असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.
शिवसेनेकडून संजय राऊत, भावना गवळी, विनायक राऊत, आनंदराव आडसूळ यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. तर चंद्रकांत खैरे आणि आढळराव पाटील यांच्यापैकी एकाला मंत्रीपद मिळू शकते. असा अंदाज वर्तवला जात आहे.