तरुणींनो 31st ला तोकडे कपडे नको ; गुजरात पोलिसांच्या सूचना

अहमदाबाद: वृत्तसंस्था – ३१ डिसेंबर सेलिब्रेट करण्याकडे तरुण तरुणींचा कल असतो. नववर्षाच्या स्वागतार्थ तरुणी तोकडे कपडे व स्कीन टच शॉर्ट कपडे वापरून पार्टीत सहभागी झाल्या तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. लोकांना अश्लील नाच करता येणार नाही. अशा सूचना गुजरातच्या बडोदा पोलिसांनी दिल्या आहेत असे समजते आहे.

याबरोबरच रात्री १० नंतर लाऊडस्पीकर व डीजेचा वापर करणाऱ्यांवर बंदी राहील. पोलिस आयुक्त अनुपमसिंह गहलोत यांनी सांगितले, अश्लील नृत्याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम हाेतो. खासगी ठिकाणी डान्सचा कार्यक्रम ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे केले आहे, असेही सिंग म्हणाले. ३१ डिसेंबर च्या पार्श्ववभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.