नवरात्रीमधील मातेचे 9 रूप आणि 9 रंग, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दुर्गा पूजा आणि नवरात्रोत्सवात नऊ रंग फार महत्वाचे असतात . जाणून घ्या, नवरात्रात कोणत्या दिवशी तुम्ही कोणता रंग परिधान करून देवी मातेची पूजा केल्याने तुम्हाला लाभ मिळते.

लाल
देवी दुर्गाचे नऊ प्रकार आहेत. पहिल्या रूपात दुर्गाजींना ‘शैलपुत्री’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कपड्यांचा रंग लाल असतो . म्हणून पहिल्या दिवशी तुम्ही लाल रंगांच्या कपड्यांचा परिधान करून मातेची पूजा अर्चना करू शकता.

निळा (रॉयल ब्लू)
नवरात्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते.म्हणून यादिवशी निळा रंगाला (रॉयल ब्लू) विशेष महत्त्व आहे.

पिवळा
आई दुर्गाच्या तिसर्‍या रूपाचे नाव चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवसाच्या पूजेस खूप जास्त महत्त्व असते. देवी चंद्रघंटाच्या पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे चांगले मानले जाते.

हिरवा
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी हिरव्या रंगला खूप महत्त्व असते . म्हणूनच या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून मातेची पूजा करावी.

राखाडी (ग्रे कलर)
नवरात्रातील पाचवा दिवस म्हणजे स्कंदमातेच्या पूजेचा दिवस. या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.

केशरी
माता दुर्गाच्या सहाव्या स्वरूपाचे नाव कात्यायनी आहे. या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान करावे.

पांढरा
माता दुर्गाचा सातवा अवतार कालरात्रि म्हणून ओळखले जाते. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान केले पाहिजेत.

गुलाबी
माता दुर्गाच्या आठव्या शक्तीचे नाव महागौरी आहे. आठव्या दिवशी गुलाबी वस्त्र परिधान करुन देवी दुर्गाची पूजा करणे शुभ मानले जाते.

आकाशी निळा
माता दुर्गेच्या नवव्या शक्तीचे नाव सिद्धिदात्री आहे. यावेळी आकाशी निळे कपडे घालून मातेची पूजा करणे शुभ मानले जाते.