व्हाईट बिकिनी घालून इलियाना डिक्रूज म्हणते- ‘I Miss the Beach’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवू़ड अ‍ॅक्ट्रेस इलियाना डिक्रूज गेल्या काही दिवसांपासून आपल्या हॉटनेसनं सोशल मीडिया तापवताना दिसत आहे. नुकताच एक नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. इलियाना यात व्हाईट बिकीनीत दिसत आहे.

इलियानानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. इलियानानं सांगितलं आहे की, तिला बीचची आठवण येत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं व्हाईट कलरची बोल्ड बिकिनी घातली आहे. फोटो शेअर करताना इलियाना म्हणते, आय मिस द बीच.

फोटोत दिसत आहे की, इलियाना बोटवर झोपली आहे. यात इलिायानाचा अवतार खूपच कातिल दिसत आहे. तिनं तिची टोन्ड बॉडी फ्लाँट केली आहे. सध्या इलियानाचे हे व्हाईट बिकिनीतले फोटो सोशल मीडियावर राडा घालताना दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा कातिल अंदाज खूप भावला आहे.

इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पागलपंती या सिनेमात दिसली होती. या सिनेमात ती जॉन अब्राहम, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, कृति खरबंदा, अरशद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता. यानंतर आता ती अजय देवगण निर्मित द बिग बुल या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2020 रोजी रिलीज होणार आहे.