उन्हाळ्यात आवर्जून प्या माठातलं पाणी ! जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे

पोलिसनामा ऑनलाइन –उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शहरातील अनेक लोक माठातील पाणी पितात. गावाकडे तर सर्रास माठाचाच वापर केला जातो. यात पाणी थंडही राहतं आणि शरीराला याचे फायदेही होतात. आज आपण माठातलं पाणी पिण्याचे 5 फायदे जाणून घेणार आहोत.

1) पचनक्रिया- माठातल्या पाण्याचं तापमान सामान्य तापमानापेक्षा थंड असतं. या पाण्याची चवदेखील चांगली असते. या पाण्यामुळं पचनक्रिया उत्तम राहते आणि मनही तृप्त होतं.

2) पीएच लेवल बॅलन्स राहते- मातीत क्षारीय गुणधर्म असतात. क्षारीय गुणधर्म पाण्यातील आम्लतेमुळं प्रभावित होतात ज्यामुळं शरीरातील पीएच स्तर संतुलित राहतो.

3) पाणी शुद्ध राहते.- माठाचा हा मातीचा बनलेला असतो. हीच माती पाणी शुद्ध करण्याचंही काम करते. जर पाण्यात काही विषारी पदार्थ असतील तर माती ते शोषून घेते आणि पाणी शुद्ध राहतं.

4) गॅसची समस्या नष्ट होते- जर कोणला, गॅस, असिडिटी अशा समस्या असतील तर त्यांनी माठातलं पाणी नक्कीच प्यावं. माठातील पाण्यानं या सर्व समस्या दूर होतात.

5) लहान-मोठे आजार होत नाहीत- फ्रिजमधील पाणी कृत्रिम पद्धतीनं आणि अति थंड केलेलं असतं. यामुळं अनेक आजारही उद्भवतात. तसं माठातील पाणी मात्र ठराविक प्रमाणातच थंड होतं. त्यामुळं अनेक लहान मोठे आजार होण्यापासून बचाव होतो. उन्हाळ्यात आवर्जून प्या माठातलं पाणी ! जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे