Clay Pot Water in Summer | उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी का प्यावे, जाणून घ्या 7 कारणे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – शहरातून पाणी पिण्याचे (drink water) मातीचे मडके जवळपास हद्दपार झाले आहे. घरोघरी फ्रिजचे पाणी प्यायले जाते. तर गावांमध्ये अजूनही काही ठिकाणी ही जुनी परंपरा सुरू आहे. मातीच्या भांड्यात पाण्याच्या बाष्पीभवन सिद्धांतानुसार, नैसर्गिक प्रकारे पाणी थंड राहते. फ्रिजच्या पाण्याने (drink-water) अनेक प्रकारचे नुकसान होते, इम्यूनिटी सुद्धा कमज़ोर होते. यासाठी जाणून घेवूयात मडक्यातील पाणी पिण्याचे कोण-कोणते फायदे आहेत.

मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे

1.कोरोना काळात मडक्याचे पाणी घशाला ठिक ठेवते. फ्रिजच्या थंड पाण्याने कोरोना काळात सर्दी, ताप होऊ शकतो.
2.मातीच्या भांड्यात पाणी थंड करून प्यायल्याने इम्यून सिस्टम ठिक राहते. मडक्यात पाणी स्टोअर केल्याने शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोनचा स्तर वाढतो.
3. माठातील पाणी अतिथंड नसते यामुळे पचन व्यवस्थित होते. नियमित प्यायल्याने पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर राहतात.
4.मातीत क्षारीय गुण असतात. क्षारीयता पाण्याच्या आम्लतेसोबत प्रभावित होऊन योग्य पीएच संतुलन देते.
5. मातीत विषारी पदार्थ शोषण्याची शक्ती आहे. माठातील पाणी प्यायल्याने सर्व सुक्षम पोषकतत्व मिळतात.
6. अंगदुखी, सूज आणि जखडण्यापासून आराम मिळतो. अर्थरायटिसच्या आजारात अतिशय लाभदायक आहे.
7.अ‍ॅनिमियापासून सुटका होते. मातीत आयर्न भरपूर असते. अ‍ॅनिमिया आयर्नच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे.

हे देखील वाचा

Good News For Youth | हुशार युवकांना पैसे कमविण्याची सुवर्णसंधी ! मोदी सरकारकडून महिन्याला 50 हजार मिळू शकतात, जाणून घ्या

Pune Fire | एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीसमध्ये 4 वर्ष सुरू होते शासनाच्या परवानगी शिवाय उत्पादन; कंपनीचा मालक निकुंज शहा याला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी

Former CM Kamal Nath | काँग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल