मद्यपी तरूणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या आवारात एका मद्यधुंद तरूणीने धिंगाणा घातला. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमरास घडली. यावेळी पोलिसांना मद्यपी तरूणीला आवरता आवरता घाम फुटला. तिचा धिंगाणापाहून पोलीस ठाण्यात आलेले नागरिक देखील आवाक झाले.

दुपारी शहरातील बस्थानकात चाळीसगावला जाणाऱ्या बसची वाट पाहत काही प्रवाशी उभे होते. त्यावेळी जिन्स पँट व टी शर्ट घातलेली एक तरुणी आली. तिने या ठिकाणी उभारलेल्या प्रवाशांना अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. नागरिकांनी याची माहिती बस स्थानकातील चौकीत असलेल्या पोलीस कॉनस्टेबल रणजीत वाळवी यांना दिली.

वाळवी यांनी याची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्यातून आलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तरुणीला शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. याठिकाणी तिची चौकशी करत असताना मद्यधुंत तरुणीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस ठाण्यात चौकशी करत असलेले अधिकारी के.डी खंडिकर व थोरात यांना तिने मी दारू पिलेली नाही, मला चाळीसगावला जायचे असल्याचे सांगितले. तसेच तिने तिचे नाव वैशाली एवढेच सांगीतले. पोलीस ठाण्यात आरडा ओरड करत तिने पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला पोलिसांनी तिला पकडून ठेवले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like