वजन कमी करण्यासाठी ‘अमेरिकन न्यूट्रिशनिस्ट’चा सल्ला ! ‘ही’ 1 सवय महत्वाची, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वजन वाढणे ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बदललेली जीवनशैली हे यामागील मुख्य कारण आहे. वजन कमी करण्यासाठी सतत घाम गाळणे आणि महागडे उपाय करण्यापेक्षा काही घरगुती उपाय असे आहेत, जे सोपे आणि विनाखर्च करता येऊ शकतात. जेवणाआधी साधारण एक ग्लास पाणी प्यायल्याने व्यक्ती फिट राहू शकते. जेवणाआधी पाणी प्यायल्याने प्रमाणापेक्षा जास्त पदार्थ खाल्ले जात नाहीत. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, असे अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट इलाना मुरस्टाइन यांनी म्हटले आहे.

हे लक्षात ठेवा

1) फार जास्त थंड किंवा फार जास्त गरम पाणी पिणे टाळावे.

2) शरीरासाठी सामान्य तापमानाचे पाणी पिणे फायद्याचे आहे. यामुळे तेल कमी केले जाते आणि पदार्थ पचन्यासही मदत होते. फॅट बर्न होण्यासही मदत होते.

3) जेवण केल्यावर लगेच ढसाढसा पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर साधारण अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

4) जेवणाआधी एक ग्लास पाणी पिणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते.

5) भारतीय आयुर्वेदानुसार जेवण करताना मधे पाणी पिणे योग्य असल्याचे सांगितले आहे. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये.

6) आयुर्वेदानुसार, जेवण करताना मधून मधून एक-एक घोट पाणी प्यायला हवे.

7) जास्त तेलकट किंवा मसालेदार भाज्या खाल्ल्या असतील तर यामुळे होणार्‍या दुष्परिणामांनाही रोखता येऊ शकते.