वारंवार गरम पाणी प्यायल्याने सुद्धा होऊ शकते समस्या, ‘हे’ 5 प्रकारचे होऊ शकते नुकसान; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोक दिवसभर गरम पाणी पित आहेत. घसा स्वच्छ ठेवण्यासाठी गरम पाणी खुप उपयुक्त असल्याचे म्हटले जात आहे. परंतु उन्हाळ्यात गरम पाण्याने तहान भागणे अशक्य होते. परंतु जास्त गरम पाणी प्यायल्याने आरोग्याचे नुकसान सुद्धा होऊ शकते. कशाप्रकारे गरम पाणी सतत प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होतो, ते जाणून घेवूयात…

1- झोपेची समस्या –
जर तुम्ही झोपताना गरम पाणी पित असाल तर झोपेची समस्या होऊ शकते. तसेच वारंवार लघवीला होऊ शकते. यामुळे रक्त वाहिन्यांच्या पेशींवर दबाव वाढतो.

2- आतील अवयवाला फोड येऊ शकतात –
जास्त गरम पाणी पित असाल तर शरीराच्या आतील अवयवांचे नुकसान होऊ शकते. पोटात जळजळीची समस्या होऊ शकते. शरीरातील टिश्यूज खुप संवेदनशील असतात. आताील भागात फोड येऊ शकतात.

3- किडनीवर परिणाम –
किडनीत खास कॅपिलरी सिस्टम असते, जी शरीरातून अतिरिक्त पाणी आणि टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. परंतु गरम पाणी किडनीवर जास्त परिणाम करते. नॉर्मल फंक्शनवर परिणाम होतो.

4- नसांना सूज येऊ शकते –
वारंवार असे केल्याने नसांमध्ये सूज येऊ शकते. तसेच डोकेदुखीची समस्या होऊ शकते.

5- रक्ताच्या मात्रेवर प्रभाव –
जास्त गरम पाणी प्यायल्याने ब्लडच्या मात्रेवर परिणाम होतो. रक्ताची एकुण मात्रा वाढते. रक्ताचे संचलन एक बंद प्रणाली आहे. याच्यावर क्षमतेपेक्षा जास्त दबाव पडल्यास, हाय ब्लड प्रेशर आणि इतर कार्डियोची समस्या होऊ शकते.