जेवणानंतर ताबडतोब चहा-कॉफी पित असाल तर आजच बदला ही सवय, अन्यथा…

नवी दिल्ली : जेवणानंतर ताबडतोब चहा पिणे अरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. रिसर्चनुसार चहा किंवा कॉफीतील कॅफीन जेवणातील पोषकतत्वांच्या अवशोषणात अडथळा आणते, यासाठी ही सवय बंद केली पाहिजे. याशिवाय इतरही काही कारणे आहेत जी सांगतात की, जेवणानंतर कॅफीन असलेले कोणतेही ड्रिंक पिणे नुकसानकारक आहे –

हे आहेत परिणाम

1. पचनशक्तीवर परिणाम – चहापत्तीमध्ये अ‍ॅसिडिक गुण असतात आणि जेव्हा ते जेवणातील प्रोटीनमध्ये मिसळतात तेव्हा प्रोटीनला कडक बनवतात ज्यामुळे प्रोटीन पचवणे जड जाते. यासाठी जेवणानंतर चहा पिऊ नये.

2. पोषणाचे कमी अवशोषण – जेवणानंतर ताबडतोब चहा प्यायल्याने पचनशक्ती प्रभावित होते, ज्यामुळे खाण्यातील पौष्टिक तत्वांची गुणवत्ता कमी होते आणि शरीर त्यांना योग्यप्रकारे अवशोषित करू शकत नाही.

3. ब्लड प्रेशर वाढणे – चहामध्ये कॅफीन असते आणि जड जेवणानंतर चहाचे सेवन केले तर ब्लड प्रेशर वाढते. हार्ट पेशेंट्सने तर जेवणानंतर अजिबात चहा पिऊ नये.

ग्रीन टी किंवा हर्बल टीचे करा सेवन
जेवणानंतर दूधाचा चहा अजिबात पिऊ नका, परंतु इच्छा असल्यास काही वेळानंतर ग्रीन टी किंवा हर्बल टीचे सेवन करू शकता. कारण या चहामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि पॉलिफेनॉल्स असते, जे पोटात गॅस होऊ देत नाही आणि पचनशक्ती योग्य ठेवते.