गरोदरपणात ‘कॉफी’चं सेवन ‘धोकादायक’, जाणून घ्या ‘रिसर्च’मधील ‘हे’ 6 निष्कर्ष

पोलीसनामा ऑनलाइन – गरोदरपणात कॉफीचे सेवन केल्याने कोणता परिणाम होतो, याचे संशोधन करण्यात आले असून हे संशोधन जर्नल ऑफ एंडोक्रिनोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहे. यातील निष्कर्ष गरोदर महिलांसाठी धक्कायदायक असे आहेत. संशोधकांनी हा प्रयोग प्रथम उंदरावर केला. यामध्ये पिल्लांना जन्म देणार असलेल्या उंदराला कॅफिन दिले. त्यामुळे ताण- तणाव वाढल्यामुळे हार्मोन्समध्ये बदल झाला आणि जन्माला आल्यानंतर पिल्लाचे वजन कमी झालेले दिसून आले. त्याच्या लिव्हरच्या विकासात अडथळा निर्माण झाला होता. या रिसर्चनुसार 2- 3 कप कॉफी प्यायल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते.

हे आहेत निष्कर्ष

1. गरोदरपणात बाळाच्या आईने कॉफीचं सेवन केलं तर आईच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

2. गरोदर महिलांनी कॉफीचे जास्त सेवन गरोदर असताना केले तर बाळाच्या अवयवांवर परिणाम होतो.

3. कॅफिनच्या सेवनाचा परीणाम बाळाच्या लिव्हरवर होतो.

4. गरोदरपणात कॅफिनचे सेवन केल्यामुळे ताण-तणाव वाढून बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो.

5. गरोदरपणात कॅफिन चे सेवन केल्यास फॅटी लिव्हर आजारपणाचा धोका वाढतो. बाळाचं वजन कमी होण्याची शक्यता असते.

6. कॅफिनच्या सेवनानाने झोपेवर सुद्दा परिणाम होतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.