Coronavirus Myth Busted : कोरोनापासून वाचण्यासाठी गरम पाण्याचा वापर उपयोगाचा नाही, सरकारचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या बाबींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातच गरम पाणी पिण्याचाही सल्ला अनेकदा दिला जातो. त्यामुळे बहुतांश लोक कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गरम पाण्यावर सर्वाधिक भर देत आहेत. पण आता त्याच संदर्भात केंद्र सरकारने महत्वपूर्ण दावा केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यापूर्वीच सिद्ध केले, की या प्रकारची कोणतीही उपचारपद्धत कोरोना व्हायरसवर मात करता येऊ शकत नाही. गरम पाणी प्यायल्याने किंवा त्याने अंघोळ केल्याने कोरोना व्हायरसवर काहीही परिणाम होत नाही. मात्र, तुमच्या प्रकृतीवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यावरूनच आता केंद्र सरकारने ट्विट करून त्याबाबत माहिती दिली आहे. जास्त गरम पाणी प्यायल्याने त्याचा फायदा होऊ शकत नाही. गरम पाणी प्यायल्याने स्थूलपणा नियंत्रणात राहतो आणि गळ्याची समस्याही दूर होते. पण याचा अतिरेक हानीकारक ठरू शकतो.

कोरोनातून बरे होण्यासाठी रुग्णांचा प्रयत्न असतो. त्यासाठी जास्तीत जास्त घरगुती पद्धतीवर लक्ष दिले जाते. त्यात अंडी, चिकन, मटण यांसारखे प्रोटिन मिळणारे पदार्थ खाल्ले जातात. तसेच वाफ घेणे, गरम पाणी पिणे यांवरही विशेष भर दिला जातो. त्याने काही प्रमाणात आराम मिळत असला तरी आता गरम पाणी प्यायल्याने काहीही फरक पडत नसल्याचा दावा सरकारने केला आहे.

गरम पाणी पिण्याचे तोटे काय?

–  जर तुम्ही गरम पाणी पीत असाल तर तुम्हाला अंतर्गत त्रास होऊ शकतो.

–  रक्ताच्या मात्रामध्ये प्रभाव पडू शकतो. जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्यास उच्च रक्तदाब आणि दुसरा कार्डिओचा आजार उद्भवू शकतो

–  गरम पाणी दोन्ही किडनीवर प्रभाव टाकतो.

–  सातत्याने गरम पाणी प्यायल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊ शकते. तसेच डोकेदुखीची समस्याही उद्भवू शकते.

–  गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा लाल पडते. आणि त्यामुळे रॅशेज किंवा अ‍ॅलर्जीही होऊ शकते.

–  त्वचेला खाजेची समस्याही उद्भवू शकते.