पाणी पिऊन देखील वाढवता येते रोगप्रतिकारक शक्ती ! जाणून घ्या कसं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनासोबतच अनेक प्रकारच्या आजारांसोबत लढण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं आहे. हेल्दी जेवण घेऊन तर तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहतेच. परंतु आता आपण हे जाणून घेणार आहोत की, पाणी पिल्यानंही तुमची रोगप्रतिकारक शक्ती कसी वाढते.

पाणी पिण्याचे फायदे –

– शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात

– शरीराचं तापमान कमी राहतं.

– आजारांना कारणीभूत बॅक्टेरिया आणि व्हायरस शरीरातून बाहेर पडतात

– पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो.

फिट राहण्यासाठी देखील दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु तुम्हाला सतत पाणी प्यायला आवडत नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनंही पाण्याचं सेवन करू शकता. ते कसं हे जाणून घेऊयात.

1)  लिंबू पाणी – दिवसाच्या सुरुवातीलाच जर गरम पाण्यात लिंबू पिळून सेवन केलं तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळं लठ्ठपणा कमी होतो. पोटाचे विकार कमी होतात. लिंबात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात. रोगप्रतिकारक शक्तीसाठीही याचा मोठा फायदा होतो.

2)  पुदीन्याचं पाणी -पुदीन्यात अँटी इम्फ्लेमेंटरी आणि अँटीऑक्सिडेंटल गुणधर्म असतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी याचा मोठा फायदा होतो. यामुळं फ्री रेडिक्लस अॅक्टीविटी रोखण्यास मदत होते.