जाणून घ्या – जेवताना पाणी प्यावं की नाही ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पाणी हे एक उत्तम पेय आहे. पाणी पिल्याने शरीर निरोगी राहते. इतकेच नाही तर त्वचाही तजेलदार आणि निरोगी राहते. दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. मात्र जेवताना पाणी प्यावे की नाही या मुद्यावर नेहमीच संभ्रम राहिलेला आहे. जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यावे की नाही ? ह्यावर खूप काही मत मांडली जातात.

आयुर्वेदानुसार, जेवताना थोड्या प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने अन्नाचं योग्यप्रकारे पचन होण्यास मदत होते. याशिवाय जबरदस्ती कधीही पाणी पिऊ नये. जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं.

पाण्याविषयी आयुर्वेदाचा नियम –

जर एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं असेल तर त्या व्यक्तीने जेवणाच्या आधी पाणी प्यावं. तर याउलट ज्या व्यक्तीला वजन वाढवायचं असेल त्या व्यक्तीने जेवणानंतर पाणी प्यावं. आपण शरीराला पाण्याच्या सेवनाबाबात अनेक सवयी लावून ठेवतो. सकाळी उठल्यावर पाणी प्यावं, रात्री झोपताना पाणी प्यावं मात्र अशा प्रकारच्या सवयी लावू नये.