बँजो पार्टीच्या वाहनाला ट्रकची धडक

ट्रक उलटल्याने चालक ठार, १३ बँडवादक जखमी

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – ओव्हरटेक करीत असताना पुढच्या बँजो पार्टीच्या वाहनाला मागून आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातामुळे ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक उलटला. मात्र, त्याच ट्रकखाली सापडून चालकाला मृत्यु झाला. ही घटना बाळापूर बायपासच्या भिकूंड नदीपुलाजवळ रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघातात बँजो बँड पार्टीतील १३ बँडवादक जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, बँजो बँड पार्टी अकोल्याहून खामगावच्या दिशेने जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेला ट्रक बँजो पार्टीच्या वाहनाला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता.

त्यावेळी समोरुन दुसरे वाहन आल्याने चालकाने ट्रक डावीकडे घेण्याच्या प्रयत्नात बँजो पार्टीच्या वाहनाला धडक दिली. त्यात वाहनातील १३ वादक जखमी झाले. धडकेनंतर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. त्यातून चालक खाली पडल. व त्या ट्रकखाली दबला जाऊन त्याचा मृत्यु झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like